photo
photo 
छत्रपती संभाजीनगर

CoronaVirus : कामगारदिनी कष्टकऱ्यांच्या घराघरात लाक्षणिक उपोषण 

अनिलकुमार जमधडे

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लॉकऊनच्या परिस्थितीने गोरगरीब कष्टकऱ्यांची उपासमार सुरू आहे. उपाययोजना तोकड्या पडत आहेत. म्हणुनच सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रास्त मागण्या लावून धरण्यासाठी कामगार दिनानिमित्त १ मे रोजी राज्यभर हजारो लोक आपापल्या ठिकाणी एक दिवसांचे सुर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत कामगार नेते बाबा आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपोषण करणार असल्याची माहिती सुभाष लोमटे यांनी दिली. 

सध्या लाखो कुटुंबांकडे रेशनकार्ड देखील नाही. सरकार काही पावले उचलत आहे. मात्र ते तोकडे पडत आहेत. कार्डधारकांना कमी दरात व काहींना मोफत धान्य दिले जात आहे. पण हे पुरेसे नाही. सामाजिक संघटना व विविध कंपन्यांनी त्यांना मदत केली आहे.  पण तीही कमी पडत आहे. ही मदतही सातत्याची असू शकत नाही. रेशनकार्ड नसलेल्या कुटुंबांची अवस्था भीषण आहे. आताच्या घडीला केवळ दयाभावनेतून केलेली तात्पुरती मदत पुरेशी नाही. गरज असलेल्या सर्वांना पुढील दोन महिने मोफत रेशनची व्यवस्था करणे आवश्यक आहे.  

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

दिलासा द्यावा 

केरळ, दिल्ली, छत्तीसगड सरकार प्रमाणे महाराष्ट्र सरकारने निर्णय घेऊन दिलासा द्यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवुन करण्यात आली आहे. कष्टकरी, परिवर्तनवादी, शेतकरी, दलित -आदिवासी, महिला, युवक- विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्त्यांनी व सर्व कष्टकऱ्यांनी कामगार दिनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषणात सहभागी व्हावे असे आवाहन जेष्ठ समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव, उल्का महाजन, कष्टकरी संघर्ष समितीचे नितीन पवार, राष्ट्रीय हमाल पंचायतचे चंदन कुमार, अन्न अधिकारी आंदोलनाच्या मुक्ता श्रीवास्तव, औरंगाबाद सामाजिक मंचचे प्रा. विजय दिवाण, ॲड. मनोहर टाकसाळ, अण्णा खंदारे, ॲड विष्णू ढोबळे, ॲड. डी. आर. शेळके, शेख अन्वर, मुकुल निकाळजे, उद्धव भवलकर, एस. जी. शुत्तारी, प्रा. उमाकांत राठोड, प्रा. चंद्रकांत चव्हाण, अजमल खान, मेराज सिद्दीकी, ज्ञानेश्वर वाघचौरे, रामचंद्र काळे, कासम भाई, छगन गवळी, देविदास कीर्तिशाही, प्रवीण सरकटे, आशाबाई डोके, डॉ. शेख इक्बाल मिन्ने यांनी केले आहे

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

अशा आहेत मागण्या

- उपासमारीवर मात करण्यासाठी गरज असलेल्या सर्वांना कार्ड नसले तरी मोफत धान्य मिळाले पाहिजे.
-  राज्यांतर्गत स्थलांतरित मजूरांना त्यांच्या गावी परत नेण्याची व्यवस्था लवकरात लवकर करण्यात यावी.
- लॉकडाऊन मधे रोजगार बंद ठेवावा लागला त्या सर्वांना थकीत वेतन देण्यासाठी यंत्रणा कार्यरत करावी. 
- अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना दुप्पट पगार द्यावे व पन्नास लाखांच्या विम्याचे संरक्षण देण्यात यावे.
- बांधकाम कामगार व मनरेगा मजूरांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्यात यावी. 
- या काळात घसरलेल्या आर्थिक वाढीच्या दराचा बोजा कामगार वर्गाच्या माथी मारु नये. 
- शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचे नुकसान भरून काढण्यासाठी नुकसानभरपाई देण्यात यावी.
- लॉकडाऊन संपवण्याची रणनीती विविध क्षेत्रातील तज्ञ मंडळींसोबत चर्चा करून ठरवण्यात यावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT